वसमत तालुक्यात भुकंपाचे हादरे वर हादरे प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक
वसमत (इसाक पठाण)
वसमत व कळमनुरी तालुक्याच्या सिमेवरील गावांना सतत भुकंपाचे हादरे वर हादरे बसत असल्याने नागरीकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे केव्हा भुकंप येईल याची धास्ती नेहमीच वाटत असताना प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून कायमस्वरूपी खबरदारीचे उपाययोजना केल्या जात नसल्याने दुर्दैवाने भविष्यात कदाचित मोठा भुकंप झालाच तर काय होईल या भीतीनेच नागरिकांची थरकाप उडत आहे
गेल्या काही वर्षांपासून वसमत – कळमनुरी तालुक्याच्या सिमेवरील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे,वापटी कुपटी या भागातील गावांना सतत भुकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत या धक्क्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत नसले तरी त्यांच्यात भीतीचे व दहशतीचे वातावरण नेहमीच निर्माण होत आहे सतत भुकंपाचे सौम्य धक्के सुरूच असल्याने भीती व दहशतीच्या छायेखाली जीवन जगावे लागत आहे यावर कहर म्हणजे शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता अचानक मोठा आवाज येऊन जमीन चांगलीच हादरली अचानक आलेल्या या भुकंपामुळे सर्वत्र भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते लोक घरातून बाहेर पडली रिस्टर स्केलवर या भुकंपाची तिव्रता ४.७ होती.हा आता पर्यंतचा सर्वात मोठा भुकंप होता. पांगरा शिंदे व आजूबाजूच्या गावात कच्च्या घराची पडझड झाली तर काही घरांना तडे गेले आहेत. हिंगोली , नांदेड,परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील काही भागा पर्यंत हे धक्के जाणवले सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी भुकंपाची तिव्रता वाढल्याने नागरिकांत अधिकच भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात नेहमीच भुकंपाचा सौम्य धक्का बसत असतो नागरिक भयभीत होतात दहशतीचे वातावरण निर्माण होते तेव्हा कोणीही घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भुकंप झाल्यास प्रशासनाकडून केले जाते . महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी भेटी देतात गरज पडल्यास पंचनामा केला जातो नंतर जैसे थे परिस्थिती राहते.हे नित्याचेच झाले आहे.
भुकंप केव्हा येईल हे कोणालाच सांगता येत नाही हे तितकेच खरे आहे वैज्ञानिकांना सुध्दा याचा शोध लावण्यात आता पर्यंत तरी यश आले नाही तरी पण याच भागात नेहमीच जमीनीतून आवाज येऊन भुकंपाचे सौम्य धक्के का बसत आहेत .या मागील कारणे का असावी अगोदर सौम्य धक्के बसत होते परंतु. आता आलेला भुकंप ४.४७ रिकटर स्केल चा होता म्हणजे त्याची तीव्रता वाढत आहे दुर्दैवाने या पेक्षा मोठा भुकंप भविष्यात झाल्यास काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने आपली जबाबदारी समजून या नेहमी होणाऱ्या भुकंपा मागील कारणे शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजेत तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे शक्य आहे का याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

