मतदार पुनरिक्षण मोहिमेला वसमत येथे गती..
वसमत
शरीफ आलम
मतदार पूनरिक्षण (एस आय आर)मोहिमेस वसमत येथे गती मिळाली असून वसमत येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये बूथ लेवल अधिकारी बी एल ओ ज्ञानेश्वर वाघमारे घरोघरी जाऊन मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करून गणना पत्रक वितरित करीत आहे.भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पूनरिक्षण मोहिमेला वसमत विधानसभा मध्ये यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत चे उपविभागीय अधिकारी तसेच मतदान नोंदणी अधिकारी विकास माने ॲक्शन मोडवर असून ३० जून पासून ते स्वतः प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन सदर कार्यक्रमाची जनजागृती करीत सक्षमपणे मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे.वरिष्ठांची अधिकारीची प्रेरणा घेत बी एल ओ सुद्धा वेगाने मोहीम रबवित आहे.शहराच्या काही प्रभागांमध्ये नगरसेवकांनी शिबिर घेऊन मतदारांचे फॉर्म भरून घेतले आहे.प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुद्धा बी एल ओ ज्ञानेश्वर वाघमारे यांनी १४३३पैकी ११५१ मतदारांची मॅपिंग केली असून २५० मतदाराचे फॉर्म ऑनलाईन करण्यात आले आहे.या पुनरीक्षणाचा (एस आय आर) याचा मुख्य उद्देश नवीन पात्र मतदारांची नोंद करणे तसेच मृत. दुबार किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदाराचे नावे नियमानुसार वगळून मतदार यादी अधिक अचूक शुद्ध आणि विश्वासहार्त बनविणे हा आहे.या मोहिमेसाठी १ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला असून त्या तारखेपर्यंत १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंद करू शकतील.निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ५ अगस्त रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल.त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती स्वीकारल्या जातील ३ ऑक्टोबर पर्यंत त्याचा निपटारा करून ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.यासाठी मतदारांनी एस आय आर मोहीम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदविण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.
