google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

सारोळा.कागबन रस्ता सुधारित कामाचे भूमिपूजन आ.राजू नवघरे यांच्या हस्ते संपन्न..

नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप..

शरीफ आलम

पाच कोटी सहा लाख रुपये खर्चून होणाऱ्या वसमत तालुक्यातील सारोळा ते कागबन रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन रविवारी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. वसमत तालुक्यातील सारोळा ते कागबन या अतीआवश्यक व महत्त्वाच्या रस्त्याची मागील कित्येक दिवसापासून दुर अवस्था झाली होती.शेतकऱ्यांना आपले सोयाबीन.तूर. हळद आदी माल वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीला आणण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत होता. याबरोबरच दुचाकी व चार चाकी वाहनांना सुद्धा मोठ्या तारेची कसरत करून प्रवास करावा लागत होता.या रस्त्याची सुधारणा व्हावी अशी मागणी सारोळा व कागबन येथील ग्रामस्थांनी विकासप्रिय आमदार राजू नवघरे यांच्याकडे केली होती.या मागणीची त्वरित दखल घेऊन आमदार राजू नवघरे यांनी या रस्त्याच्या सुधारित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत तब्बल ५ कोटी ६ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.एकूण लांबी ४.१५० कि.मी असणाऱ्या या सुधारित रस्त्याचे कामाचे आज रविवारी आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.सोबतच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विनायक ऑप्टिकल्स व राजू भैया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.यावेळी दगडू विक्रम कदम, सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे.वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, तातेराव कोरडे.त्रिंबक.डॉ संतोष कदम.सरपंच संभाजी दुधाटे.उपसरपंच पांडुरंग कदम.शाळा समिती अध्यक्ष बालाजी कदम.बालाजी फेगडे.उत्तम दुधाटे.उद्धव कुसळे.सूर्यभान ढवळे. बालाजी पवार.हनुमान ढवळे. सरपंच बालासाहेब कांबळे. ज्ञानेश्वर दुधाटे.ज्ञानेश्वर कदम. रामराव कदम.हरिभाऊ कदम.श्रीरंग वाघमारे.दौलत पांचाळ.साहेब पांचाळ. पोलीस पाटील शिवारी फुलारी.साईनाथ दुधाटे, नागनाथ दुधाटे.शिवलिंग चिलवंत.शंकराव कदम. तुकाराम चव्हाण.प्रभातराव कदम.शिवाजी कदम, मनोहर फुलारी.विठ्ठलराव कदम. पुरभाजी कदम.सखाराम कोरडे यांच्यासह सारोळा व कागबन येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share
Back to top button