google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

हिंगोली जिल्हा मजूर सहकारी फेडरेशन अध्यक्षपदी नईम कुरेशी यांची बिनविरोध निवड ..

शरीफ आलम

 

वसमत तालुक्याचे नामवंत कंत्राटदारा मोहम्मद नईम कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.२३ ऑगस्ट रविवारी रोजी ११ वाजता हिंगोली येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात जिल्हाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती.या निवड प्रक्रियेमध्ये मोहम्मद नईम कुरेशी यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पठाडे यांनी जाहीर केले.नईम कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार राजू नवघरे यांचे वडील आणि नईम कुरेशी यांचे मित्र रमाकांत पाटील नवघरे यांनी त्यांचे शाल. श्रीफळ.पुष्पहार देऊन जंगी सत्कार केले.यावेळी लक्ष्मीकांत नवघरे.आमदार राजू नगर यांचे खंदे समर्थक मुबिन जमीनदार.नगरसेवक राजकुमार इंगळे.गौतम वाहूळे हारून दालोवाले.राष्ट्रवादी काँग्रेसचेअजगर पटेल.वसंत चेपुरवार.एन आय पठाण.कॉन्ट्रॅक्टर वसीम कुरेशी.प्रमोद उबारे.शेख जावेद.शेख कलीम यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील प्रतिष्ठित नागरिक कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

Share
Back to top button