google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

रविवारी पांगरा शिंदे येथे एंडोस्कोपी आपल्या दारी शिबिराचे आयोजन 🔶🔷🔶🔷🔶🔷 डॉ नितीन जोशी यांच्या गॅलक्सी फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाचे 130 वे शिबिर .

संपादक -इसाक पठाण

वसमत:-

तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रविवार दिनांक 30 आगस्ट रोजी नांदेडचे प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ नितीन जोशी यांच्या एंडोस्कोपी रुग्णालयाचे एंडोस्कोपी आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

मराठवाडयात नवाजलेले नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ नितीन जोशी हे एंडोस्कोपी आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत खेडोपाडी तथा दुर्गम भागात जाऊन पोटाच्या विकारांवरील रुग्णांना घरपोच एंडोस्कोपीची सुविधा उपलब्ध करून देतात.त्यामुळे रोगाचे निदान होऊन त्यावर तातडीने उपचार होण्यास मदत मिळते.

आज पर्यंत डॉ नितीन जोशी यांनी ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात 130 शिबिरे आयोजित करून रुग्णांना घरपोच सेवा देऊन त्यांच्या रोगांचे निदान केले. काही जणांना कॅन्सर सारख्या रोगाचे निदान झाल्याने प्राथमिक अवस्थेत त्यावर उपचार होऊन रुग्ण बरे झाले आहेत.

डॉ नितीन जोशी हे मराठवाड्यातील नावाजलेले पोट विकार तज्ज्ञ व एंडोस्कोपी तज्ज्ञ डाक्टर आहे.नांदेडला ते गॅलक्सी हास्पीटल चालवितात.या रुग्णालयात प्रचंड प्रमाणात पोटाच्या विकारांवरील रुग्णांची गर्दी राहते.तरी पण सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर नितीन जोशी हे फीरते एंडोस्कोपी पथक व्दारे ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात जाऊन रुग्णांची सेवा करण्याचे महान कार्य करीत आहे

याच अनुषंगाने वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात रविवार दिनांक 30 आगस्ट रोजी रोकडेश्वर मंदिरात एंडोस्कोपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Share
Back to top button