वेडसर अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात तिघां आरोपींना अटक ⭕⭕⭕⭕⭕⭕ 15 दिवसांपूर्वी याच मुलीवर अत्याचार करणारा आरोपी ही अटकेत.चौघांना 5 दिवसाची पोलीस कोठडी 🔷🔶🔷🔶🔷🔶
वसमत:-
तालुक्यातील एका 13 वर्षीय वेडसर अल्पवयीन मुलीला बिस्कीट व पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींवर तसेच पंधरा दिवसांपूर्वी याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या अन्य एका आरोपी विरोधात हट्टा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे
वसमत तालुक्यातील हट्टा हे राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत गाव म्हणून ओळखले जाते.परंतू अश्या हया गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे .
दिनांक 13 आगस्ट रोजी दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान गावातील एक वेडसर अल्पवयीन मुलीला गावातीलच विजय खाडे,लखन निवृत्ती खाडे, प्रविण गुणाजी खाडे या तिघां आरोपींनी त्याच्या वेडसरपणाचा गैरफायदा घेत तिला बिस्कीट व 50 रुपये देतो असे आमिष दाखवून मोटार सायकलवर बसवून हट्टा येथील तळया जवळ सामूहिक अत्याचार केला .
तसेच 15 दिवसांपूर्वी प्रकाश यंकटी खाडे या आरोपीने सुद्धा याच मुलीला बिस्कीट देण्याच्या आमिषाने ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला.
या प्रकरणी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात चार आरोपी विरोधात विविध कलमान्वये तसेच पोस्को अक्ट नुसार गुन्हा दाखल झाला असून चार ही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या अमानुष घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बोरकर अधिक तपास करीत आहेत.

