गॅलक्सी हेल्थकेअर नांदेडचे डॉ नितीन जोशी ‘सप्तरंग आरोग्य भूषण ‘ पुरस्काराने पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित 🔷🔶🔴🔶🔷 आरोग्यसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल

संपादक -इसाक पठाण
नांदेड, :–
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या गॅलक्सी हेल्थकेअर, डॉ नितीन जोशी नांदेड यांना त्यांच्या उल्लेखनीय आरोग्यसेवेबद्दल *स्वातंत्र्यदिनी ‘आरोग्यभूषण पुरस्कार*’ प्रदान करण्यात आला.
*सप्तरंग सेवाभावी प्रतिष्ठान, नांदेड आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने कुसुम सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार १५ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला*. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री *अतुल सावे*, खासदार *डॉ. अजित गोपछडे*, जिल्हाधिकारी * राहुल कर्डीले*, महानगरपालिका आयुक्त *डॉ. महेश डोईफोडे* सप्तरंग प्रतिष्ठानच्या अध्यक्ष्या *डॉ सान्वी जेठवानी* तसेच भाजपा नेते संजय कौडगे, संतुकराव हंबरडे, चैतन्यबापू देशमुख, किशोर देशमुख आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गॅलक्सी हेल्थकेअरचे संचालक व सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. नितीन जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आरोग्यसेवा ही केवळ उपचारांची प्रक्रिया नसून समाजाप्रती असलेली मानवी जबाबदारी आहे, या भावनेतून गॅलक्सी हेल्थकेअरकडून रुग्णसेवेचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आधुनिक वैद्यकीय सेवा पोहोचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
सप्तरंग महोत्सवातही आरोग्यसेवेचा जागर
सप्तरंग सेवाभावी प्रतिष्ठानच्या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने गॅलक्सी हेल्थकेअर फाऊंडेशनने आरोग्यसेवेचा सामाजिक संदेश प्रत्यक्ष कृतीतूनही दिला. दि. १६ ऑगस्ट रोजी *महोत्सवस्थळी मोबाइल एंडोस्कोपी शिबिराचे आयोजन करण्यात आले*. हे गॅलक्सी हेल्थकेअरच्या ‘मोबाइल एंडोस्कोपी क्लिनिक’चे १२९ वे शिबिर होते.
या शिबिरात एकूण ७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णांची आवश्यक रक्त तपासणी तसेच एंडोस्कोपी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसोबतच रुग्णांच्या सामाजिक गरजेची जाणीव ठेवत त्यांना अन्नदानही करण्यात आले.
आरोग्यसेवा ही केवळ रुग्णालयाच्या चार भिंतींपुरती मर्यादित न राहता ती समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून गॅलक्सी हेल्थकेअर फाऊंडेशनकडून मोबाइल एंडोस्कोपीच्या माध्यमातून सातत्याने सेवा दिली जात आहे. *सप्तरंग महोत्सवासारख्या सांस्कृतिक उपक्रमातही आरोग्यसेवेचा हा उपक्रम राबविणे म्हणजे ‘सेवा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी’ यांचा सुंदर संगम* असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
‘जिथे कोणी नाही, तिथे आम्ही’
जिथे कोणी नाही, तिथे आम्ही’ या भावनेतून गॅलक्सी हेल्थकेअरने आरोग्यसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णांच्या वेदना आणि त्रास कमी करून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे, तसेच आरोग्याबाबत जनजागृती करणे, या उद्देशाने संस्थेचे कार्य सुरू आहे.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. नितीन जोशी यांनी *हा सन्मान केवळ आपला नसून गॅलक्सी हेल्थकेअरच्या संपूर्ण टीमचा असल्याचे सांगितले*. डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, तंत्रज्ञ, प्रशासनातील कर्मचारी आणि रुग्णसेवेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे कार्य शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“हा *पुरस्कार आम्ही आमच्या समस्त रुग्णांना समर्पित करतो*. हा सन्मान आमच्यासाठी केवळ गौरव नसून जनतेला निरोगी ठेवण्यासाठी, त्यांच्या त्रास आणि वेदना सुसह्य करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे,” अशी भावना डॉ. नितीन जोशी यांनी व्यक्त केली.
‘आरोग्यभूषण’ हा सन्मान गौरवापेक्षा अधिक मोठी जबाबदारी आहे. जनतेला निरोगी ठेवण्यासाठी, त्यांच्या वेदना आणि त्रास सुसह्य करण्यासाठी तसेच आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी गॅलक्सी हेल्थकेअरचे कार्य यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.
या पुरस्कारासाठी *सप्तरंग सेवाभावी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवानी, प्रतिष्ठानचे सर्वच मान्यवर सदस्य डॉ. ओमप्रकाश दरक, सीए श्री. हर्षद शहा* तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे गॅलक्सी हेल्थकेअरच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवातील आरोग्यसेवा उपक्रम आणि ‘आरोग्यभूषण’ पुरस्कार या दोन्ही माध्यमातून समाजसेवा आणि आरोग्यसेवा यांचा एकत्रित संदेश नांदेडकरांसमोर आला असून, अशा उपक्रमांतून ‘निरोगी समाज’ घडविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले आहे.

