google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

ईद -ए-मिलादुन्नबी निमित्त खालेद शाकेर यांच्या वतीने लाडू वाटप 🔷🔶🔷🔶🔷🔶 युवा नेते लक्ष्मीकांत नवघरे यांची विशेष उपस्थिती

संपादक -इसाक पठाण

वसमत:-

ईद-ए-मिलादुन्नबी (स) निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना शहरातील प्रसिद्ध उघोजक, समाज सेवक तथा माजी नगरसेवक खालेद शाकेर यांच्या वतीने बुंदी लाडू वाटप करण्यात आले

बुधवार दिनांक 26 आगस्ट रोजी शहरात ईद -ए-मिलादुन्नबी (स) निमित्त भव्य जुलुस ए मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या निमित्ताने शहरातील प्रसिद्ध उघोजक तथा समाजसेवक माजी नगरसेवक खालेद शाकेर यांच्या वतीने बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी जुलूस मध्ये उपस्थितांनी लाडूचा स्वाद घेतला.

यावेळी आमदार राजू भैय्या नवघरे यांचे बंधू युवा नेते लक्ष्मीकांत नवघरे यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले.यावेळी युवा नेते लक्ष्मीकांत नवघरे, खालेद शाकेर,सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेख करिमोद्दीन,करीम खान पठाण,मुजाहेद शाकेर,रफीउल्ला खान, मोबीनदा,मिठू भाई,फारुख अली,अनवर फारुखी, सय्यद इसरार, ज्येष्ठ पत्रकार इसाक पठाण, माजी नगरसेवक शफीउल्ला खान पठाण, अय्युबदा ,सालेक खालेद शाकेर, शयान मुजाहेद शाकेर , खुर्शीद भाई , आदी उपस्थित होते.

Share
Back to top button