प्रभाग क्रमांक 1 मध्ये आयोजित एसआयआर गणना प्रपत्र भरणा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ▶️▶️▶️▶️▶️▶️ नगरसेवक हारुण दालवाले यांचा उपक्रम ➖➖➖➖➖➖

संपादक ::-इसाक पठाण
वसमत:-
एसआयआर कामाला गती मिळावी तसेच निवडणूक आयोग व प्रभागातील मतदारांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक 1 चे युवा व कर्तव्यदक्ष नगरसेवक शेख हारुण दालवाले मदतीला धावून आले असून त्यांनी प्रभागात एक दिवसीय गणना प्रपत्र भरणा शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडोंच्या संख्येने अर्ज भरण्यात आले.
सघा एसआयआर चा दुसरा टप्पा 30 जून पासून सुरू झाला आहे . या टप्प्यात मतदारांचे गणना प्रपत्र भरून ते आनलाईन करण्याची प्रक्रिया बीएलओ मार्फत युद्ध पातळीवर सुरू झाली आहे.या टप्प्यात शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ नियुक्त आहेत. सध्याच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांना ते घरोघरी जाऊन दोन गणना प्रपत्र देऊन त्यात सधाची अचूक माहिती भरून घेत आहेत. परंतु बहुतांश अशिक्षित मतदारांना अर्ज अचूक भरून देण्यासाठी उपलब्ध कागदपत्रे व तपशील कसा सांगावा हे समजत नसल्याने मतदारांची तारांबळ उडत आहे तसेच बीएलओना अशिक्षित व महिला मतदारांकडून माहिती भरून घेण्यात त्रास होत आहे . तसेच कमी कालावधीत जास्त काम असल्याने वेळेत काम पूर्ण होईल की नाही याची काळजी बीएलओना लागली आहे अशा अडचणीच्या वेळी सामाजिक जाणीव ठेवून प्रभाग क्रमांक 1 चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक शेख हारुण दालवाले निवडणूक आयोग व मतदारांच्या मदतीसाठी सहकार्य भावनेतून मैदानात उतरले आहेत.ते मतदाराची जनजागृती करत त्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत विशेष म्हणजे त्यांनी बीएलओ व मतदारांच्या सोयीसाठी आपल्या प्रभागात रविवार दिनांक 12 जून रोजी जुम्मापेठ येथील शादीखाना मध्ये एसआयआर गणना प्रपत्र (इनोमरेशन अर्ज) भरणा शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात बीएलओ मार्फत मतदारांना गणना प्रपत्र अचूक भरून दिले गेले .या शिबिरात बीएलओ शिवाजी राठोड,माजीद खान पठाण,शेख मोबीन, राम किशन जमदाडे यांनी दिवसभर उपस्थित राहून मतदारांची पडताळणी करून गणना प्रपत्र भरले .विशेष म्हणजे यावेळी नगरसेवक शेख हारुण दालवाले दिवसभर या ठिकाणी उपस्थित होते तसेच त्यांचे कार्यकर्त्यांनी सुद्धा उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले
नगरसेवक शेख हारुण दालवाले यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
