google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत येथे हिंगोली जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी स्पर्धा आयोजित

संपादक:-इसाक पठाण

वसमत:-

नागपूर येथे आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेसाठी (ज्युनिअर व सिनियर मुलं मुली) हिंगोली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी वसमत येथे ज्युनिअर व सिनियर मुलं मुलींची निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या निवड चाचणी स्पर्धेत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा असे आवाहन हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशन चे जिल्हा सचीव अमजद खान उर्फ नम्मू यांनी केले आहे

नागपूर येथे दिनांक 21आगस्ट ते 23 आगसट दरम्यान टेनिस बाल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 19 जुलै रोजी शहरातील जिल्हा परिषद प्रशाला मैदानावर हिंगोली जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या चाचणी स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले- मुली (ज्युनिअर टीम) व वरिष्ठ पुरुष व महिला (सिनियर टीम) अश्या हिंगोली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे विशेष म्हणजे राज्यस्तरीय स्पर्घेत सहभागी विद्यार्थ्याना ग्रेस मार्क तसेच केंद्र सरकारमध्ये नोकरी साठी भरीव संधी उपलब्ध आहेत शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संघ निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशन चे जिल्हा सचीव अमजद खान उर्फ नम्मू यांनी केले आहे.

Share
Back to top button