जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांचा सत्कार..
वसमत
शरीफ आलम
जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वसमत येथील योग परिवारातर्फे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांचा सत्कार करण्यात आला.मागील तीन-चार वर्षांपासूनआमदार राजू नवघरे यांनी आरोग्य मंत्रालयात वसमत उपजिल्हा रुग्णालय डायलिसिस सेंटर तसेच सोनोग्राफी मशीन उपलब्ध करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करून उपलब्ध करून दिल्या.आमदार राजू नवघरे यांच्या प्रबळ सहकार्यामुळे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली असून दररोज ३०० ते ३५० बाह्य रुग्णालयाचा रोग निदान करून उपचार केला जातो. शहरातील व ग्रामीण भागातील दिव्यांगणा रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हिंगोली येथे ये जा करावी लागत होती.मात्र उपजिल्हा रुग्णालयातच दिव्यांग बोर्ड ची स्थापना करण्यात आली असून दर मंगळवारी उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांगाला दिव्यांग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयातच उपलब्ध करण्यात आले आहे.उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुविधा ही सुद्धा सुरू करण्यात आली असून याचा मोठा प्रमाणे लाभ शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना होत आहे. मागील दोन वर्षापासून प्रत्येक वर्षी ३०० ते ५००डोळ्याच्या आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या आहे. डॉ गंगाधर काळे यांच्या याच रुग्णसेवेची दखल घेत बसमत योग परिवारातर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून योग गुरु तुळशीराम ताटेवर. बालाजीराव जाधव दिलीप माळवटकर.ज्येष्ठ नागरिक विलासराव मुंडे. बाबुराव बुड्डेवार. शिवाजी गुडेवार. अरुणाताई कुंटूरवार.सुनिता गुडेवार आदींनी बुधवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांचा सत्कार करून सन्मान केला. तसेच योगपरिवारातर्फे डॉ सौरभ मसारे.डॉ शहनाज शेख डॉ मयुरी कलेटवाड आदींचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी योगगुरु तुळशीराम ताटेवार यांनी योगपरिवारातर्फे उपजिल्हा रुग्णालयात दररोज दोन सदस्य हे रुग्णसेवक म्हणून उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयातील रुग्णांची अडीअडचणी जाणून घेऊन ते डॉक्टरांच्या साह्याने सोडविण्याचा प्रयत्न करतील असे सांगितले.

