शहर पोलिसांच्या वतीने हेल्मेट जनजागृती बाईक रॅली नागरिकांनी हेल्मेटचा नेहमी वापर करावा- पो.नि.सुधीर वाघ

वसमत (इसाक पठाण)
अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि या अपघाता मधून मृत्यु याचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे यावर उपाय म्हणजे दुचाकी स्वारांनी दैनंदिन जीवनात दुचाकीवरुन जाताना हेल्मेट चा नेहमी वापर करावा असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यत पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे या निमित्ताने नागरिकांत हेल्मेटचा वापर या विषयी जनजागृती करण्यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात हेल्मेट जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती या रॅलीत पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह 60 पोलिस व होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता शहराच्या मुख्य मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली.
या विषयी अधिक माहिती देताना शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी सांगितले की 2025 ते आज पर्यंत जिल्ह्यात 546 अपघाताची नोंद झाली आहे तर यात 314 जणांचा मृत्यू झाला आहे अपघात झाल्यावर दुचाकी स्वार हेल्मेट नसल्यास सरळ डोक्यावर पडतो व डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यु होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे हा खुप संवेदनशील विषय आहे.अपघातात मृत्युमुखी पडलेला व्यक्ती हा घरातील कर्ता पुरुष असू शकतो त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते तो अपघातात गेल्यावर तिच्या कुटुंबीयांवर जीवनभराचे संकट उभे राहते.आपले कुटुंब आपली जबाबदारी प्रमाणे तसेच आपला जीव आपली जबाबदारी हे लक्षात घेऊन दैनंदिन जीवनात हेल्मेट घालूनच बाहेर पडावे.तसेच दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट चा नेहमी वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

