नांदेड -मुंबई विशेष रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्यात यावे – वसमत शहर काँग्रेसची मागणी
वसमत (इसाक पठाण)
नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या हज यात्रेकरु व त्यांचे मित्र नातेवाईकांची प्रचंड गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे विभागाने नांदेड – मुंबई विशेष रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्यात यावे अशी मागणी शहर काँग्रेस कमिटी वसमतच्या वतीने उपविभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांना निवेदना व्दारे करण्यात आली आहे
नांदेड ,हिंगोली ,परभणी जिल्हा व्यतिरिक्त मराठवाडा व विदर्भातील हज यात्रेकरु मुंबई मार्गे पवित्र हजला जात आहे.मे महिन्यात मोठ्या प्रमाणात हज यात्रेकरु हजला मुंबई विमानतळावरुन जात आहे मुंबईला जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचे सोयीचे साधन आहे.हज यात्रेकरुंना सोडण्यासाठी त्यांचे मित्र व नातेवाईक मोठया प्रमाणात मुंबईला जातात.परंतू नांदेड -मुंबई विशेष रेल्वेला डब्बे कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे त्यामुळे रेल्वे विभागाने अतिरिक्त डब्बे जोडल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही. त्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर , अब्दुल हफीज अ रहमान प्रदेश सरचिटणीस काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम धर्माच्या हज यात्रेसाठी रवाना होत असलेल्या यात्रेकरू यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिनांक 10, 12 ,15 मे रोजी नांदेड ते मुंबई विशेष रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्यात यावे याकरिता वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष शेख अलीमोददीन व पदाधिकारी यांनी जिल्हा रेल्वे अधिकारी प्रदीप कामले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
यावेळी अब्दुल हफिज अब्दुल रहमान प्रदेश सरचिटणीस काँग्रेस, शेख अलीमोदीन शहराध्यक्ष काँग्रेस,अँड रिशीकेश देशमुख तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी, साईनाथ जाधव पाटील जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, यूवराज आवटे गट नेता न.पा, डॉक्टर नजीब शेख,सय्यद अज्जू नगरसेवक,जाविद खूरेशी नगरसेवक, रविकिरण वाघमारे, तोहीद अफजल,शेख इरफान,साई कुरुंदकर, शेख इरफान, शेख समिर, मूजाहेद इनामदार, जाविद पटेल, मूजीब सदर, खालेद kk, रियाज पठान, उपस्थित होते.

