भोरीपगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वसमत (इसाक पठाण)
भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील भोरीपगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावाचे उपसरपंच प्रतिनिधी अनिल साहेबराव आगलावे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरीपगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच कामाजी पानपट्टे, अनिल साहेबराव आगलावे, मारोती आगलावे, सखाराम भारती, गंगाधरआगलावे,निवती आगलावे,मारोती भारती, दिगंबर भारती,रंगनाथ आगलावे, तरुण उघोजक निलेश गवळी, कुंडलिक भारती,गणपत भारती,कोंडबाखैरे,गौस भाई, ज्ञानदेव आगलावे, एकनाथ आगलावे,रामू आगलावे, शिवाजी सावंत, गौतम पानपट्टे,उतम पानपट्टे,चांदू पानपट्टे, रमेश ठोके,प्रकाश गजभार, सुरेश शिंदे, सुनील आगलावे, नारायण बोडखे, वाघु भारती, सुभाष खरबडे सर,तुळवाड सर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष व विघार्थी उपस्थित होते.

