चिमुकल्यांच्या नृत्य अविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध….
शरीफ आलम
येथील केंब्रिज मॉन्टेसरी प्रीप्रायमरी शाळेचे स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी आपल्या नृत्य अविष्काराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी केंब्रिज मोंटेसरी शाळेचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले.या कार्यक्रमा प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनीता मनमोहन बाहेती. नगरसेविका उत्कर्षा बाहेती.डॉ रेणुका पतंगे.भाजप नेत्या प्रीती जयस्वाल शाळेचे अध्यक्ष वसंत चेपूरवार नगरसेवक एड.कट्टेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध संस्कृतीत गीतांवर सुलेमान अहेमद.श्रेयस दगडू. श्रीशा उबाळे.देवांशी तोरेवार. श्रीनिका चेपुरवार.अद्वैत स्वामी.आदीसह चिमुकल्यांनी आपल्या नृत्य अविष्काराच्या चमकदार प्रदर्शनामुळे श्रोत्यांना मंत्रमुग्न केले. यावेळी चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेल्या आनंद नगरी सह विविध स्पर्धेतील विजयी झालेल्या चिमुकल्यांना नगराध्यक्ष सविता मनमोहन बाहेती.नगरसेविका उत्कर्षा बाहेती.डॉ रेणुका पतंगे प्रीती जयस्वाल शाळेचे अध्यक्ष वसंत चेपूरवार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवानी उबाळे आदींच्या हस्ते पदक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती चटप यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका शिवानी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती चटप.शिवकन्या अंबोरे.वर्षा भावनवार.योगिता गुडेवार सोनाली चावळे आदी शिक्षकांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमात पालक.शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
