लालबहादूर शास्त्री विद्यालयात “भन्नाट 2026” प्रेरणादायी सेमिनार संपन्न

वसमत (इसाक पठाण) —
लालबहादूर शास्त्री विद्यालय, वसमत येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी “भन्नाट 2026 कसे घडवायचे?” या विषयावर आधारित एक भव्य, प्रेरणादायी व प्रॅक्टिकल सेमिनार अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या सेमिनारमध्ये सहभागी वकील बंधु-भगिनींसाठी भविष्यातील नियोजन, सकारात्मक सवयी, संधींची ओळख व योग्य निर्णयक्षमता यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागींकडून प्रत्यक्ष कृती करून घेण्यात आल्याने हा सेमिनार अधिक प्रभावी ठरला.
या कार्यक्रमासाठी मुंबई येथील प्रसिद्ध युट्यूबर व मोटिवेशनल लीडर श्री. विनोद मेस्त्री तसेच ऊर्जावान मार्गदर्शक श्री. अतिश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री. विनोद मेस्त्री सर यांचे लाखो तरुणांवर प्रभाव टाकणारे युट्यूबवरील मार्गदर्शन आज देशभरातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत असून त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. संदीप चव्हाण सर यांनी प्रभावी प्रशिक्षण सत्र घेतले. हा कार्यक्रम वकील संघ, वसमत यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
या उत्कृष्ट प्रशिक्षण सत्रासाठी उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल लायन्स क्लबकडून श्री. संदीप चव्हाण सरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून लालबहादूर शास्त्री विद्यालय, वसमत एक वे गळी व प्रेरणादायी ओळख निर्माण करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
