*’हेल्दी वसमतचा’ नारा देत संपन्न झाली वसुमती मॅरेथॉन..* तिसऱ्या वर्षाच्या स्पर्धेचा उत्साह शिगेला….

वसमत: (इसाक पठाण)
वसमतचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू भैय्या नवघरे सेवाभावी संस्था यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित वसूमती मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल चार हजार तरुण, तरुणी, वृध्द व महिला पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.यावेळी मराठी सिनेअभिनेता तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी उर्फ राणादा यांची प्रमुख उपस्थिती होती
दररोजच्या धावपळीच्या जीवनात सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आज हेल्दी वसमतचा नारा देत वसूमती मॅरेथॉन २०२६ संपन्न झाली.महाराष्ट्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘वसुमती मॅरेथॉन २०२६’ ही स्पर्धा रविवार,११ जानेवारी रोजी पार पडली असून युवा पिढीचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि महिला भगीनींची प्रेरणादायी धाव वसमतकरांना पाहायला मिळाली.
राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान आणि बाभूळगाव सेवाभावी संस्था यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी वसूमती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मयुर मंगल कार्यालय,कारखाना रोड येथून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेस आमदार राजूभैय्या नवघरे आणि हिंगोली जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. या मॅरेथॅान स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणून मराठी सिने अभिनेता तुझ्यात जीव रंगला मालिकेचा फेवरेट हिरो हार्दिक जोशी उर्फ राणादा यांची उपस्थिती होती.
सहा गटात संपन्न झालेल्या स्पर्धेत तब्बल चार हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये एकूण शंभर रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती.
भारताच्या विविध प्रांतातून स्पर्धक आले होते. शिवाय वसमतच्या सर्वांनी उत्फुर्त प्रतिसाद देत मॅरेथॉन यशस्वी केली. सर्वांमध्ये हम सब एक है ची भूमिका दिसून आली. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज संपन्न झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km केवळ धावल्याच नाही स्पर्धा जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या अनेकांना आश्चर्यचकीत करणार्या होत्या.थंडीची तमा न करता हिंमतीच्या बळावर अगदी सहजपणे त्यांनी ही स्पर्धा जिंकून दाखवली.
अनेक तरूण,तरूणी,जेष्ठ नागरीक,महिलांनी आपल्या वयोगटातील स्पर्धा पूर्ण करून आपण शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे सिद्ध केले.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी नगराध्यक्षा सुनिता बाहेती, हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव नादरे,उपजिल्हाधिकारी विकास माने, मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड , उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, तहसीलदार श्रीमती शारदा दळवी,गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड , पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, गजानन बोराटे, अड.रामचंद्र बागल, तानाजी बेंडे,चंद्रकांत दळवी, जिजामामा हरणे, त्र्यंबक कदम, गौतम दवणे, कांचनताई शिंदे, आदित्य आहेर, विनोद अंभोरे, आशिर्वाद इंगोले, संजय दराडे, विश्वनाथ फेगडे, मनोज भालेराव, मुजीब पठाण, शेख मोहसिन, आशाताई देशमुख, भिमराव सरकटे, सचिन भोसले, बाबाराव राखोंडे, कन्हैया बाहेती, नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इमरान अली, सचिन दगडू, शेख हबीब शेख बशीर,दीपक हळवे, राजकुमार एंगडे,धनंजय गोरे, हारून दालवाले,शशिकुमार कूलथे,दिलीप भोसले, गौतम वाव्हळे,शेख कादर, आयफान चाऊस, नय्युम पाशा, संकेत नामपल्ली, प्रभाकर क्षिरसागर, अविष्कार मनोहरे, मोहमद कामरान,
विनायक सातपुते, डा.रेणूका पतंगे तर क्रिडा प्रशिक्षक हरिभाऊ रावळे,निवृत्ती बांगर, रमेश गंगावणे, प्रा. नवनाथ लोखंडे,प्रा.नागनाथ गजमल, प्रा. सतिश बागल यांची प्रमुख भूमिका होती…
