जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची बहिर्जी स्मारक महाविद्यालयास सदिच्छा भेट*
शरीफ आलम
हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बहिर्जी बहिर्जी स्मारक महाविद्यालयास सदिच्छा भेट देवून महाविद्यालयाचा परिसर व पायाभुत सुविधा यांची पाहणी केली. यावेळी वसमत परिसरातील विद्यार्थ्या करीता नवीन स्पर्धा परीक्षा अभ्यासिका , इनडोअर क्रीडा स्टेडियम, मुलींचे वस्तीगृह, गार्डन व खेळाचे मैदान इ.ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदविला व १० किलोमीटर चे अंतर ४८ मिनिटांत पार केले. स्पर्धे नंतर त्यांनी महाविद्यालयात भेट दिली. मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही. मोठ्या उत्साहाने त्यांनी सर्व ठिकाणी पाहणी केली व संवाद साधत मार्गदर्शक सूचना केल्या. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख प्राचार्य डॉ जाधव यांनी यावेळी सादर केला.
यावेळी भारतीय राष्ट्रीय पेटंट मिळाले बद्दल प्रा डॉ अनिल मुगुटकर यांचा जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वसमतचे आमदार राजु नवघरे व उपविभागीय अधिकारी विकास माने विशेष उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव माजी आमदार पंडितराव देशमुख, संस्थेचे पदाधिकारी श्री पंडितराव सारंग , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बाबुराव खिल्लारे ,प्राचार्य डॉ मा मा जाधव , उपप्राचार्य डॉ महेश स्वामी , आयक्युएसी समन्वयक डॉ पिंपरणे यांच्या सह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
