वसमत शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप

वसमत (इसाक पठाण)
अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजीद खान पठाण यांचा वाढदिवस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील वृध्दांबरोबर साजरा केला.
अकोला विधानसभा मतदारसंघ चे आमदार साजीद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन व तालुका अध्यक्ष अड ॠषिकेष देशमुख यांच्या पुढाकाराने शहर व तालूका काँग्रेसच्या वतीने येथील वृध्दाश्रमातील वृध्दांना आपुलकी व सहानुभूती ची खाऊरुपी शीदोरी देण्याचा हेतूने खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी वसमतचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अ.हफीज अ.रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृध्दाश्रमातील वृध्द पुरुष व महिलांनी खाऊचा मनसोक्त आनंद घेतला.’इन्सान का इन्सान से हो भाईचारा यही संदेश हमारा’ असा संदेश देत तसेच मोहब्बत की दुकान उघडत अशा माणुसकी व आपुलकी चे कार्य करणाऱ्या शेख अलीमोद्दीन (अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी बसमत) व ऋषिकेश देशमुख(तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वसमत) यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अ.हफीज अ.रहेमान , शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन, तालुका अध्यक्ष अड ॠषिकेष देशमुख ,पाडू चव्हाण, रियाज पठान, मिर्झा सज्जाद बेग, मूजीब सदर, खालेद के.के, मजहर पाशा,शेख इरफान, शेख समिर, शफीक , मोबिन आदी उपस्थित होते.

