हट्टा बसस्थानकाचे भूमिपूजन आ.राजू नवघरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

वसमत
शरीफ आलम
वसमत तालुक्यातील हट्टा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या बसस्थानकाचे भूमिपूजन सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजु नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. आ.राजू नवघरे यांनी मागील कित्येक दिवसापासून सातत्यपूर्ण पाठपुरा करून या बसस्थानकाला निधी मंजुरी करून घेतला त्यामुळे परिसरातील नागरिकांत तसेच व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.आमदार राजू नवघरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्याने हट्टा येथे बसस्थानकास मंजुरी दिल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ आमदार राजु नवघरे यांच्या हस्ते करण्यात आला.या बसस्थानकामुळे हट्टा व परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या भूमिपूजन सोहळ्याला जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनोद आंभोरे, उपसभापती भगवानराव काचगुंडे गावचे सरपंच,उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि हट्टा ग्रामस्थांनी हट्टा परिसराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या कार्यसम्राट आमदार राजू नवघरे यांचा सत्कार करून आभार मानले.

