google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत येथे जिल्हास्तरीय नवोदय विद्यालय प्रवेश सराव परिक्षा संपन्न

वसमत (इसाक पठाण)

पढ़ेगा बसमत तो बढ़ेगा बसमत असा जयघोष करीत सलग सहाव्या वर्षी वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या वतीने शहरात जिल्हास्तरीय नवोदय विद्यालय प्रवेश सराव परिक्षा आयोजित करण्यात आली होती

पढ़ेगा बसमत तो आगे बढ़ेगा बसमत या उक्तीप्रमाणे वसमत येथे जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे आज आयोजन करण्यात आले होते.येथील एल बी एस विघाल्यात घेण्यात आलेल्या सराव परिक्षेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.व लगेच सराव परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आला त्यामुळे सराव करून लगेच निकाल ही लागत असल्याने विद्यार्थी कुठे चुकतात, कमी पडतात हे त्यांच्या लक्षात येते व मुख्य परीक्षेला ते अधिक तयारीने जातात.यात लहान मुलांपासून तर स्पर्धात्मत्क परीक्षेची तयारी करणारे सर्वांना याचा फायदा होतो. अनेकजण लांबून या परीक्षेसाठी येतात त्यामुळे या सर्वांसाठी चहा, नाश्ताची सोय करण्यात आली होती. तसेच परीक्षेसाठी लागणारी पेन, पेन्सिल तत्सम स्टेशनरी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.

या मागचा उद्देश असा की नवी पिढी शिकली पाहिजे , घडली पाहिजे. सोशल मीडियावर अकारण टाइम पास करणारी नव्हे तर मोठे उच्चशिक्षित अधिकारी पिढी आपणास बनली पाहिजे . त्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून सतत हे कार्य केले जात आहे आणि याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आमदार राजू भैया नवघरे यांच्या मेहनतीचे सोने होते आहे हे दर्शवित आहे.असे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे.

Share
Back to top button