google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वाढते प्रदूषण रोखण्याकरिता केंद्र सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात.. खासदार डॉ फौजिया खान

 

शरीफ आलम

देशातील वाढत्या वायू आणि जल प्रदूषणाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अक्षरशः आणीबाणीसारखी स्थिती आल्याची परिस्थिती उद्भवली आहे.या आपातकालीन स्थितीत हे प्रदूषण रोखण्याकरिता केंद्र सरकारने कठोर उपाय योजना करून अंमलबजावणी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार डॉ फौजिया तहसीन खान यांनी राज्यसभेत केली आहे. प्रदूषणा केवळ पर्यावरणीय मुद्दा नाही प्रदूषणाने संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच दिवसेदिवस धोक्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात प्रदूषणाने अक्षरशः आणीबाणीसारखी स्थिती आणली आहे. जीव धोक्यात घालणाऱ्या धोक्याच्या मर्यादेपर्यंत प्रदूषणाची पातळी नियमितपणे पोहोचत आहे असे असताना आपण उदासीनता सहन करू शकत नाही असे स्पष्ट करीत खासदार डॉ फौजिया खान यांनी प्रदूषणाच्या आपत्कालीन स्थितीवर त्वरित कठोर उपाय योजनेची अंमलबजावणी व्हावी त्यासाठी उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जावी असे सुचवुनी खान यांनी केली.सरकारने या दृष्टीने जलद गतीने व एका समानपणे उपाययोजना अंमलबजावण्या करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पर्यावरणी नियमाच्या केंद्रस्थानी असलेली प्रदूषण नियंत्रण मंडळे त्यांची विश्वासार्हता आणि त्यांच्या वैज्ञानिक आदेशाची पूर्तता करण्याची क्षमता कमी असणाऱ्या प्रणाली भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरल्या आहेत. कमकुवत झाले आहेत.असे त्या म्हणाल्या. कमकुवत नागरी जाणिवा आणि प्रचंड भ्रष्टाचार यावर टीका टिप्पणी करतेवेळी केवळ राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रभक्ती व्यक्त होऊ शकत नाही. तर व्यवहारात मातृभूमीच्या सर्वार्थाने रक्षणाकरिता नागरिकांनी वर्तने सुधारली पाहिजेत.जबाबदारीने काम केले पाहिजेत.पर्यावरणाचे पालन केले पाहिजेत.असेही डॉ फौजिया खान म्हणाल्या.

Share
Back to top button