google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत नगर परिषद निवडणुकीत 74.07 टक्के मतदान

वसमत (इसाक पठाण)

वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीत एकुण 74.07 टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये 83.02 टक्के तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 11 मध्ये 68.68 टक्के झाले आहे.रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी परभणी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सकाळी मतमोजणी होणार असून दुपार पर्यंत सर्वच निकाल जाहीर झाल्यानंतर कोण बना बाजीगर हे पाहायला मिळणार आहे.

वसमत नगर परिषदेची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली एकूण 15 प्रभागातील 30 नगरपरिषद सदस्य व 1 थेट नगराध्यक्ष निवडीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा मतदान केंद्रावर पहावयास मिळाल्या या निवडणुकीत मतदारांनी विक्रमी मतदान केले. एकूण 59855 मतदारांपैकी 44332 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण 74.07 टक्के मतदान झाले.

प्रभाग क्रमांक 01 (शुक्रवार पेठ) मध्ये एकूण 4322 मतदारांपैकी 3588 मतदारांनी मतदान केले यात 83.02% मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान व राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे खैसर अहमद यांच्यात चुरशीची लढत झाली.

प्रभाग क्रमांक 02 मध्ये एकूण 3667 मतदारांपैकी 2835 मतदारांनी मतदान केले 77.31 टक्के मतदान झाले.

प्रभाग क्रमांक 03 मध्ये एकूण 4021 मतदारांपैकी 3170 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी 78.84% मतदान झाले

प्रभाग क्रमांक 04 मध्ये एकूण 4352 मतदारांपैकी 3193 मतदारांनी मतदान केले एकूण 73.37% मतदान झाले. या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे व शिवसेना शिंदे गटाचे प्रभाकर क्षिरसागर यांच्यात एका गटात अटीतटीची लढत झाली.

प्रभाग क्रमांक 05 मध्ये एकूण 4816 मतदारांपैकी 3640 मतदारांनी मतदान केले या ठिकाणी 75.58% मतदान झाले. या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक अड.शेख मोहसीन व भाजपाचे सिताराम म्यानेवार समोरासमोर आहे.

प्रभाग क्रमांक 06 मध्ये एकूण 4276 मतदारांपैकी 3122 मतदारांनी मतदान केले येथे 73.01% टक्के मतदान झाले .

प्रभाग क्रमांक 07 मध्ये एकूण 3353 मतदारांपैकी 2578 मतदारांनी मतदान केले (76.89%) या ठिकाणी भाजपाचे माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार प्रमुख उमेदवार मैदानात आहे

प्रभाग क्रमांक 08 मध्ये सर्वात कमी 1926 मतदार आहेत या पैकी 1570 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याची टक्केवारी (81.52% ) या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रभाग क्रमांक 09 मध्ये एकूण 3960 मतदारांपैकी 2869 मतदारांनी मतदान केले (72.45%)

प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकूण 4084 मतदारांपैकी 2821 मतदारांनी मतदान केले (69.07%)

प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वात कमी मतदान झाले या ठिकाणी 4208 मतदारांपैकी 2890 मतदारांनी मतदान केले(68.68%)

प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकूण 3900 मतदारांपैकी 2812 मतदारांनी मतदान केले (72.10%)

प्रभाग क्रमांक 13 मध्ये 3886 मतदारांपैकी 2683 मतदारांनी मतदान केले (69.04%)

शहरातील महत्त्वाच्या बिग फाईट असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आमदार राजू भैय्या नवघरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे सय्यद इमरान अली हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याची लढत प्रामुख्याने काँग्रेसचे तौहीद अफजल यांच्याशी होत आहे या प्रभागात एकूण 4819 मतदारांपैकी 3587 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला (74.43%)

प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकूण 4265 मतदारांपैकी 2974 मतदारांनी मतदान केले (69.73%)

अशा प्रकारे एकूण 59855 मतदारांपैकी 44332 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 74.07% बंपर मतदान झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या एडवोकेट सीमा अब्दुल हफीज, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना युतीच्या सुनीता मनमोहन बाहेती व भाजपच्या सुषमा शिवदास बोड्डेवार यांच्यात सामना होता.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी विकास माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदान शांततेत पार पडले.

रविवार 21 डिसेंबर रोजी परभणी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे यात कोण जिंकते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे

Share
Back to top button