लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईड व नवजीवन हॉस्पिटलतर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
वसमत : (इसाक पठाण)
लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईड व नवजीवन हॉस्पिटल, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी वसमत शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत राधा कृष्ण मंदिर, सरस्वती कॉलनी, नगर परिषद समोर, नवजीवन हॉस्पिटल जवळ, वसमत येथे संपन्न होणार आहे.
या मोफत आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी मधुमेह (शुगर), रक्तदाब (बी.पी.), कोलेस्ट्रॉल तपासणी, बी.एम.डी. (हाडांची घनता), वजन व बीएमआय तपासणी यांसह तज्ञ डॉ . वैभव पडोळे एम.डी.मॅडिसन, डॉ.देवदत्त दळवी छाती तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
शिबिरासाठी अनुभवी तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. “आरोग्य हीच खरी संपत्ती” या उक्तीप्रमाणे नागरिकांनी स्वतःसह कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांना शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आयोजकांनी नमूद केले आहे.
तरी वसमत शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9890488002 – कल्याण कुरुंदकरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

