वसमतचे उपजिल्हा रुग्णालय डायलेसेस मशीनच्या प्रतिक्षेत
वसमत:- (इसाक पठाण)
किडनी रुग्णांसाठी अति आवश्यक असलेली डायलेससिस मशीन ही गेल्या एक वर्षापासून येथील उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध न झाल्याने किडनी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी डायलेसीस युनीट सुरू करण्यासाठी मशीनची ऑर्डर देण्यात आली असली, तरी युरोपीयन देशातून येणाऱ्या या मशीन गेल्या एक ते दीड वर्षापासून उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यातच आरोग्य विभागाच्या डायलेसीस सिस्टीमसाठी आवश्यक बजेट उपलब्ध नसल्याने गरजू व गरीब किडनी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
उप जिल्हा रुग्णालयात इतर सर्व सुविधा रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध करूण ठेवल्या आहेत .
*मागील एक वर्षांपासून वसमत येथील पत्रकार मोईन कादरी यांनी संबंधित कंपनीचे मॅनेजर तसेच उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून व सातत्याने पाठपुरावा करत आहेत* मात्र, प्रत्येक वेळी केवळ कारणे व आश्वासनेच मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गरीब व गरजू रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या डायलेसीस युनिटसाठी संबंधित कंपनीला शासनाकडून बजेट उपलब्ध करून दिले जात नसल्याने किडनी आजारग्रस्त रुग्णांची हेळसांड सुरू आहे.
वसमत येथील एक सामाजिक जाणिवेचा नागरिक स्वतःसह इतर रुग्णांसाठी वारंवार संबंधितांशी दूरध्वनीवर संपर्क साधत आहे. मात्र बजेटअभावी व मशीन भारतात उपलब्ध नसल्याने संबंधित यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे.
- आरोग्य विभागाच्या मंत्र्यांनी या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच लोकप्रिय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. वसमतचे डायलेसीस युनिट लवकरात लवकर सुरू न झाल्यास रुग्णांचे हाल अधिकच वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

