google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

दुचाकीवरील कंदुरीचा बकरा अचानक उसळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू .

वसमत (इसाक पठाण)

परभणीला कंदुरीसाठी मोटर सायकल वर बकऱ्याला घेवून जात असताना बकरा अचानक उसळल्याने मोटरसायकल चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकल बरोबर त्याची समोरासमोर धडक झाली या भिषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील नितीन नरवाडे व कपील हटकर हे दोघे नांदुसा येथून वसमत मार्गे परभणीला गुरुवारीच्या कंदुरीसाठी एक बकरे मोटरसायकलवर आपल्या सोबत नेत होते गुरुवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास ते तेलगाव -आरळ गावाजवळ आले असता मोटरसायकल वर असलेल्या बकऱ्याने अचानक उसळी घेतली त्यामुळे चालकाचा मोटरसायकलवरील नियंत्रण सुटला त्याच वेळी कळमनुरी तालुक्यातील बऊर येथील शेख सिराज व त्यांची पत्नी हे दोघे पती पत्नी मोटरसायकलवर परभणीहून गावाकडे जात होते तेव्हा या मोटरसायकल वर अनियंत्रित मोटरसायकल समोरासमोर आदळली.

या भिषण अपघातात नितीन नरवाडे व शेख सिराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शेख सिराज ची पत्नी तसेच नरवाडे यांच्या सोबत असलेल्या कपील हटकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे प्रथमोपचार करून नांदेडला पाठविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव , पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी जमादार ताम्रध्वज कासले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ज्या बकऱ्याची कंदुरी करायची होती त्याच बकऱ्यामुळे घात झाल्याने दोघांचा या भीषण अपघातात नाहक बळी गेल्याने नांदुसा व बऊर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Share
Back to top button