google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत सामुहिक विवाह मेळाव्यात 21 जोडपी अडकली लग्नबंधनात डॉ.अजय मुंदडा यांचा स्तुत्य उपक्रम

वसमत (इसाक पठाण)

वसमत येथील युवा नेते डॉ. अजय जयप्रकाश मुंदडा यांचा सामाजिक पुढाकाराने भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला असून या निमित्ताने 21जोडपी विवाह बंधनात अडकली आहे

वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आपल्या लाडक्या लेकीचे लग्न कसे करावे या विवंचनेत असलेल्या वधु पित्याला मदतीचा हात देण्यासाठी वसमत मध्ये युवा नेते डॉ अजय जयप्रकाश मुंदडा यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी दर्शन घडले. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठान’ च्या वतीने दिनांक 3 मे रोजी आयोजित २१ वधू-वरांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा अत्यंत मांगल्यमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.

सामाजिक जाणिवेचे ‘मुंदडा’ मॉडेल;-

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. अजय जयप्रकाशजी मुंदडा यांनी घेतलेला हा पुढाकार सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. लग्नसराईत होणारा अफाट खर्च टाळून सामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे संसार सुखाने थाटावेत, या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मुंदडा यांनी केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे, तर सामाजिक ऋणांची परतफेड करत हे पाऊल उचलल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

मान्यवरांची मांदियाळी:–

या सोहळ्याला माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय नेते, व्यापारी, शेतकरी, पत्रकार आणि कष्टकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी डॉ. अजय मुंदडा, अड. दीपक मुंदडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले. हा केवळ विवाह सोहळा नसून, ही एक सामाजिक चळवळ आहे,” अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये: शिस्तबद्ध नियोजन:

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने २१ जोडप्यांनी गृहस्थाश्रमात पदार्पण केले.

आर्थिक आधार:

महागाईच्या काळात पालकांवरील लग्नाचा आर्थिक भार हलका झाल्याने अनेकांच्या डोळ्यांत सुखाचे अश्रू पाहायला मिळाले.

लोकसहभाग:

हजारो नागरिकांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांवर अक्षता टाकून त्यांना शुभाशीर्वाद दिले. “सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हेच आमचे कर्तव्य आहे. शेतकरी आणि कष्टकरी बांधवांवरील आर्थिक भार हलका व्हावा, या भावनेतूनच या सोहळ्याचे आयोजन केले असे मतडॉ. अजय जयप्रकाशजी मुंदडा (आयोजक) यांनी व्यक्त केले.

वधु -वरा वर शुभेच्छांचा वर्षाव:-

वसमतच्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, नूतन दांपत्यांना सुखद भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

Share
Back to top button