google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

एसआयआर अभियानात नगरसेविका डॉ रेणुका पतंगे यांचा सक्रिय सहभाग ▶️▶️▶️▶️▶️▶️

 

संपादक:- इसाक पठाण

वसमत:-

प्रभागातील बीएलओ व मतदारांच्या मदतीसाठी प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका डॉ रेणुका गजानन पतंगे धावून आल्या असून त्यांनी प्रभागात शिबिर आयोजित करून बीएलओ व मतदारात समन्वय निर्माण करुन गणना प्रपत्र भरून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

विशेष सखोल पुनरीक्षण(SIR) अभियाना अंतर्गत निवडणूक आयोगाकडून मतदार यादया अघावत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या अभियानात बीएलओ प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून गणना प्रपत्र भरून ते आनलाईन करण्यात व्यस्त आहे यावेळी काही अशिक्षित मतदारांना अडचणी येत आहेत त्या सोडविण्यासाठी तसेच या राष्ट्रीय कार्यात लोकप्रतिनिधी म्हणून आपण ही मोलाचे योगदान दिले पाहिजे या हेतूने प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका डॉ.रेणुका गजानन पतंगे यांनी आपल्या प्रभागात जातीने लक्ष घालून या कामात मतदार व बीएलओ चे सहकार्य करीत आहे.त्यांनी आपल्या प्रभागातील बीएलओ व मतदार यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी एक दिवसीय शिबीर आयोजित केले होते या शिबिरात बीएलओ यांनी उपस्थित राहून मतदारांचे योग्य मार्गदर्शन केले व अचूक गणना प्रपत्र भरून ते आनलाईन करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक शेख मोहसीन यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार सारंग चव्हाण,नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर ,अनिल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व बीएलओ यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नगरसेविका डॉ रेणुका गजानन पतंगे यांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share
Back to top button