google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

विकास कामातून जनतेचे ॠण फेडणे माझे कर्तव्य:- आ.राजू भेय्या नवघरे

वसमत (इसाक पठाण)

वसमत विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला दोन वेळा निवडून देऊन आमदार केले त्यामुळे विकास कामातून जनतेचे ॠण फेडणे हे मी माझे कर्तव्य समजतो असे प्रतिपादन आमदार राजू भैय्या नवघरे यांनी केले.शहरातील शुक्रवार पेठ भागात मुस्लिम समाजासाठी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य शादीखाना (मंगल कार्यालय)चा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

वसमत शहरात मुस्लिम समाजाच्या गोरगरीब व सामान्य लोकांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरात शादीखाना(मंगल कार्यालय) असावे ही कितीएक वर्षांपासून मुस्लिम समाजाची मागणी होती नव्हे तर या समाजाचे दीव्य स्वप्न होते.सर्वसामान्याची इच्छा आकांक्षा कृतीत आणण्याचे कार्य वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी पुर्णत्वास नेण्यासाठी दोन कोटीच्या जवळपास निधी उपलब्ध करून दिला या निधीतून शादीखान्याची भव्य दिव्य सुंदर वास्तू उभी राहिली आहे

शुक्रवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते शादीखाना चा लोकार्पण सोहळा पार पडला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना बासीत खासमी होते तर नगराध्यक्षा सुनिता मनमोहन बाहेती यांचे प्रतिनिधी कन्हैया बाहेती, उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अ.हफीज अ.रहेमान ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद बडवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आमदार राजू भैय्या नवघरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पहिल्यांदा मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा मला सर्व समाजा बरोबरच मुस्लिम समाजाने सुद्धा भरभरून मतदान केले त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून सर्वां बरोबर मुस्लिम समाजाचे काम करणे हे मी माझे कर्तव्य समजतो त्या अनुषंगाने मुस्लिम समाजासाठी शादीखाना ची फार मोठी आवश्यकता होती एक कोटी नव्वद लाख रुपये शासनाकडून प्राप्त करून हा भव्य शादीखाना उभारला आहे.शहरात प्रत्येक प्रभागात नाली, सिमेंट रस्ते,पाण्याची पाइपलाइन टाकून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे तसेच शहरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू होणार आहे.शहर व विधानसभा मतदारसंघातील विकास कामे करत आलो करत राहीन असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अ.हफीज अ.रहेमान, नगर परिषद उपाध्यक्ष सय्यद इमरान अली, मौलाना बासीत खासमी, आनंद बडवणे, माजी नगरसेवक अजगर पटेल, डॉ.सना उल्ला खान यांनी मार्गदर्शन केले व आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या विकास कार्याचे कौतुक केले.

यावेळी शादीखानाचा काम सुंदर आकर्षक व गुणवत्तापूर्ण केल्या बद्दल गुत्तेदार खैसर अहमद यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते.

विशेष म्हणजे मुस्लिम बहुल असलेल्या शुक्रवार पेठ या भागात मुस्लिम समाजासाठी परवडेल अशा माफक दरात शादीखाना उपलब्ध झाल्याने विशेषतः गरीबाचे विवाह सोहळे या भव्य दिव्य शादीखानात थाटात संपन्न होणार हे मात्र नक्की.

Share
Back to top button