google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते भव्य शादीखाना ( मंगल कार्यालय) चे लोकार्पण

वसमत (इसाक पठाण)

शहरातील शुक्रवार पेठ भागात मुस्लिम समाजासाठी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य शादीखाना अर्थात मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते पार पडणार आहे

वसमत शहरात मुस्लिम समाजाच्या गोरगरीब व सामान्य लोकांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरात शादीखाना(मंगल कार्यालय) असावे ही कितीएक वर्षांपासून मुस्लिम समाजाची मागणी होती नव्हे तर दीव्य स्वप्न होते.सर्वसामान्याची इच्छा आकांक्षा कृतीत आणण्याचे कार्य वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी पुर्णत्वास नेण्यासाठी दोन कोटीच्या जवळपास निधी उपलब्ध करून दिला या निधीतून शादीखान्याची भव्य दिव्य सुंदर वास्तू उभी राहिली आहे

शुक्रवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते शादीखाना चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे यावेळी नगराध्यक्षा सुनिता मनमोहन बाहेती,नगर परिषद उपाध्यक्ष सय्यद इमरान अली यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या लोकार्पण सोहळयाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शादीखाना समीतीने केले आहे.

मुस्लिम बहुल असलेल्या शुक्रवार पेठ या भागात मुस्लिम समाजासाठी परवडेल अशा माफकदरात शादीखाना उपलब्ध झाल्याने विशेषतः गरीबाचे विवाह सोहळे थाटात संपन्न होणार आहे.

Share
Back to top button