आधुनिक ऑर्थोडॉन्टिक उपचारांमध्ये डॉ.मोहम्मद शकेब अहमद यांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी..
जागतिक वैद्यकीय क्षेत्रातील ग्राफी अनायनर चे प्रमाणपत्र प्रदान..
बसमत
शरीफ आलम
आधुनिक दंतचिकित्सा आणि ऑर्थोडॉन्टिक उपचारांमध्ये सातत्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारे वसमत रेम्बो इस्माईल डेंटल क्लिनिकचेअनुभवी दंतरोग तज्ञ ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ.मोहम्मद शकेब शफी अहमद यांनी दक्षिण कोरियातील अत्याधुनिक ग्राफि अलायनर तंत्रज्ञानाचे अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त केले आहे त्यांना हे प्रमाणपत्र मुंबई येथे १९ जुलै रोजी दक्षिण कोरिया चे ग्राफी इंक चे ग्लोबल सेल प्रमुख लुईस ॲन. दक्षिण कोरियाचे उत्पादन विकास प्रमुख डॉ तन्वीर अहमद खान (पी.एच.डी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.ग्राफी हे जगातील पहिले 3D प्रिंटेड क्लिअर अलायनर तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते.डॉ.शकेब यांनी औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयातून बीडीएस (BDS) पदवी आणि मुंबई येथून एमडीएस (MDS ऑर्थोडॉन्टिक्स) पदवी संपादन केली आहे. त्यांनी२०१८ पासून इंविसलाईन उपचारपद्धतीचा वापर सुरू केला असून.२०२१ मध्ये मुंबई येथे अमेरिका स्थित इंविसलाईनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र प्राप्त केले.त्यानंतर २०२६ मध्ये त्यांनी ग्राफी अलायनरचे अधिकृत प्रमाणपत्रही मिळवले.उपलब्ध माहितीनुसार.नांदेड. परभणी.हिंगोली.बीड. धाराशिव.आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये कार्यरत ऑर्थोडॉन्टिस्टांमध्ये२०१८ पासून इंविसलाईन उपचारपद्धतीचाअवलंब करणारे.२०२१मध्ये इंविसलाईन चे अधिकृत प्रमाणपत्र आणि २०२६ मध्ये ग्राफी अलायनर चे प्रमाणपत्र प्राप्त करणारे ते बहुधा पहिले ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत.२०२३ पासून डॉ.शकेब हे तालुकास्तरावर ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑर्थोडॉन्टिक आणि आधुनिक दंतचिकित्सा सेवा उपलब्ध करून देतआहेत. बसमत येथील रेनबो स्माईल डेंटल क्लिनिक येथे ते आपल्या तज्ज्ञ सेवांद्वारे रुग्णांना आधुनिक उपचारांचा लाभ देत आहेत. महानगरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपचारपद्धती ग्रामीण व तालुकास्तरीय रुग्णांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने ते रुग्णांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.डॉ.शकेब अहमद हे वसमत येथील रेनबो किड्स चे संचालक सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ.मोहम्मद शारेक शफी अहमद यांचे बंधू आहेत. वैद्यकीय सेवेला समर्पित असलेल्या या कुटुंबाची आरोग्यसेवेतील परंपरा पुढे नेत.डॉ शकेब अहमद आधुनिक दंतचिकित्सेच्या माध्यमातून ग्रामीण व तालुकास्तरीय रुग्णांना जागतिक दर्जाच्या उपचारसुविधा उपलब्ध करून देत आहेत.डॉ.शकेब अहमद हे क्लिअर अलायनरद्वारे दात सरळ करण्याच्या उपचारांसह रूट कॅनल ट्रीटमेंट (RCT), अक्कलदाढ शस्त्रक्रिया, दंतप्रत्यारोपण व प्रोस्थेसिस, प्रगत डिजिटल दंतचिकित्सा तसेच सर्व प्रकारच्या दंतसेवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध करून देतात.रुग्णांना जागतिक दर्जाच्या, तंत्रज्ञानाधारित आणि विश्वासार्ह दंतसेवा देण्याच्या उद्देशाने डॉ.शकेब अहमद सातत्याने नवीन कौशल्ये आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचारपद्धती आत्मसात करत असून.ग्राफी अलायनर याचे प्रमाणपत्र ही त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. त्यांच्या या वैद्यकीय क्षेत्रात प्राप्त झालेल्या उपलब्धी बद्दल वसमत शहरासह हिंगोली जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

