google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

अड. चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने समाज कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

वसमत:-(इसाक पठाण)

शहर व तालुक्यात समाजकार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाने उपक्रम हाती घेतला असून या निमित्ताने वसमत लिंगायत समाजातील समाज कार्य करणाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने वसमत येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर निलेश डिग्रसे यांची निवड झाली त्याबद्दल मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महात्मा बसवेश्वर जयंती वसमत मध्ये अत्यंत उत्साहात शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने काढण्यात आली होती जयंती महोत्सव यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जयंती समितीचे तरुण व तडफदार अध्यक्ष गोविंद आप्पा यजगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाटील नगर भागातून महात्मा बसवेश्वर जयंती दरवर्षी काढणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी प्रतिनिधी म्हणून वैभव त्रिमल्ले यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला

ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन कापूसकरी, उपाध्यक्ष सत्यनारायण नखाते , सचिव दिगंबर हुसे,रमेश आप्पा पत्रे ,भैरवनाथ देशमुख ,चंद्रकांत महाजन ,लक्ष्मीकांत मुटकुळे, महादेव बेले,प्रा.संतोष खाकरे ,प्रभाकर बेले,अमोल संगेकर सोमनाथ हेरे,डॉ. गंगाधर हेसे,विजय कापसे,संजय बेंडके,राजेंद्र कापसे, रमेश दर्गू ,दीपक महाजन,अमोल संगेकर,श्याम धोंडे ,देवाशिष बेले, राधाकृष्ण पत्रे ,गजानन पत्रे ,काशिनाथ कापसे, विजय कापसे,नारायण महाजन ,बाळासाहेब नखाते,राजु नखाते, ॲड चंद्रकांत देवणे,केशव आप्पा महाजन,रमेश बोचरे,गजानन पत्रे, वाणी समाजाचे अध्यक्ष मन्मथआप्पा बेले यांच्यासह मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Share
Back to top button