पुरजळ येथे भव्य मोफत नेत्र तपासणी.मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर..
आ.राजू नवघरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन..
वसमत
शरीफ आलम
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूरजळ सर्कलच्या वतीने ३१जुलै शुक्रवारी बालाजी मंदिर परिसरात भव्य नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी वसमत विधानसभेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर.महारक्तदान शिबिर.स्वच्छता अभियान. वृक्षारोपण.अभंग वाणी कार्यक्रम.महिला सन्मान कार्यक्रम आदी विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेत जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरजळ सर्कलच्या वतीने पुरजळ येथील बालाजी मंदिर परिसरात शुक्रवारी भव्य नेत्र तपासण.मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरामध्ये नांदेड येथील लॉयन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी सिडको येथील नेत्र तज्ञ डॉक्टर नेत्र रुग्णाची तपासणी करून निदान करणार आहे.तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची शस्त्रक्रिया नांदेड येथील रुग्णालयात करण्यात येणार आहे.तसेच या शिबिरामध्ये रक्तदाब.मधुमेह रुग्णांची सुद्धा तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे.तरी या शिबिरात पुरजळ सर्कलमधील सर्व गावातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी आणि मधुमेह.रक्तदाब तपासणी करून घ्यावी असे आव्हान बाजार समितीचे संचालक माऊली ढोबळे.शिवाजी चोपडे.बाबाराव राखोंडे.गणेश डुकरे.नारायण चोपडे.गणेश हारके.दिलीप वैद्य.तुकाराम वैद्य.निळकंठ नेव्हल.दामोदर शेळके.लक्ष्मण पावडे.गजानन शेळके आदींनी केले आहे.

