google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

नांदेडचे प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांना सेवा पुरस्कार 2026 प्रदान

नांदेड:- (इसाक पठाण)

नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा 2026 सेवा पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पोट विकार तज्ञ गॅलेक्सी हॉस्पिटल नांदेडचे डॉ.नितीन जोशी यांना प्रदान करण्यात आला असून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात नावाजलेले नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांनी मागील 10 वर्षांत वैद्यकीय, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत गॅलक्सी रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन त्यांनी मोबाईल इंडोस्कोपी सेंटरच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना गावपोच सेवा देऊन रोगाचे त्वरित निदान करून कॅन्सर सारख्या जिवघेण्या आजाराचे पहिल्या व दुसऱ्या स्टेज मध्ये त्यास नियंत्रण करुन त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .त्यांनी केलेल्या कार्यांची दखल घेत त्यांच्या या योगदानाचा व सत्कर्माचा गौरव करण्यासाठी नांदेड मेडिकल फाउंडेशनने डॉ नितीन जोशी यांना श्रीमती प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार 2026 देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हाटेल चहल पहल जुना कौठा नांदेड येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ पी .डी .जोशी पाटोदेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पदमाकरराव पंडीत यांची उपस्थिती लाभली होती.

तर यावेळी नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सविता भालेराव, सचीव डॉ.उमेश भालेराव तसेच पुरस्कार समितीचे संयोजक डॉ.सुशांत चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात डाक्टर, वकील, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

यावेळी पुरस्कार विजेते डॉ नितीन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी 2000 साली डाक्टर झालो. नांदेडला 10 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब रुग्ण पैशा अभावी शहरातील रुग्णालयात जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा रोग गंभीर होतो त्यामुळे अशा गरीब रुग्णांसाठी जानेवारी 2022 मध्ये इंडोस्कोपी आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला.या माध्यमातून मोबाईल इंडोस्कोपी रुग्णालय मराठवाडा व विदर्भातील ग्रामीण भागातील 59 गावात जाऊन 111 शिबिर आयोजित केले .या माध्यमातून 28800 किलो मीटर चा प्रवास करीत दुर्गम व डोंगराळ भागात जाण्याचा योग आला तेव्हा ग्रामीण भागातील सरकारी डाक्टर व ग्रामस्थांनी भरपूर प्रमाणात सहकार्य केले व योगदान दिले या सर्वांना तसेच डॉ.मुकुंद जोशी, मंदीरी जोशी , डाक्टर सुशील राठी, डॉ. उमेश भालेराव गलेक्सी हास्पीटल नांदेडचा स्टाफ, नांदेड चे रुग्ण यांना हा पुरस्कार समर्पित करतो असे ही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की शरीराचीच नाही तर मनाची सुध्दा काळजी घेणे आवश्यक आहे. हे स्पर्घेचे युग आहे त्यामुळे विघार्थ्यावर मानसिक दडपण येत आहे त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे.त्यामुळे त्यांना या दडपनातून बाहेर काढण्याचे काम केले पाहिजे.

डाक्टरांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्याचे काम करावे.आरोग्य मंदिरे उभारली पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.शेवटी त्यांनी नांदेड मध्ये आल्यानंतर  सहकार्य करणारे शर्मा ट्रॅव्हल्स चे अनिल शर्मा तसेच अडचणीच्या काळात धावून आलेले डॉ.सुशील राठी डॉ.पदमा राठी व तसेच डॉ.उमेश भालेराव ,डॉ रिभा भालेराव यांचे विशेष आभार मानले.

Share
Back to top button