google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमतकरांनी जनगणना २०२५ साठी ऑनलाइन नोंदणी करा-मुख्याधिकारी सय्यद रफिक

शरीफ आलम

वसमत शहरातील नागरिकांसाठी ‘ऑनलाइन स्वगणना’ (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी यात सहभाग नोंदवत‌ जनगणना २०२५ साठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले आहे.भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जनगणना २०२५’ मोहिमेला गती देण्यासाठी वसमतनगर नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे.नगर परिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेळ वाचवणारी आहे. या मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:नोंदणीची महत्त्वाची माहिती:कालावधी :- ही ऑनलाइन सुविधा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीतच उपलब्ध असेल.अधिकृत वेबसाइट :- नागरिक census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती नोंदवू शकतात. प्रक्रिया:- मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून घराचा ‘युजर आयडी’ तयार करावा लागेल. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची आवश्यक माहिती ऑनलाइन भरता येईल.युजर आयडी जपून ठेवा:- ऑनलाइन माहिती सबमिट केल्यानंतर मिळणारा ‘युजर आयडी’ नोंदवून ठेवावा. जेव्हा प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी देणे आवश्यक आहे.वैशिष्ट्ये:-ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केवळ १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. विशेष म्हणजे माहिती भरण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर १६ भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, अर्धवट भरलेली माहिती ‘सेव्ह’ (Save Draft)करण्याची सोयही देण्यात आली आहे.दिनांक १६ मे पासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गणना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यापूर्वी नागरिकांनी या ऑनलाइन सुविधेचा वापर करून आपला वेळ वाचवावा आणि या राष्ट्रीय कार्यात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वसमत नगरपरिषद मुख्याधिकारी सय्यद रफीक व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share
Back to top button