जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी भवनासाठी दीड कोटीचा निधी मंजूर..
आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नाला यश..
शरीफ आलम
औंढा तालुक्यातील मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनास मंजुरी मिळाली असून या शेतकरी भवनासाठी आमदार राजू नवघरे यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र राज्य सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडून तब्बल दीड कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे.वसमत विधानसभेचे विकास प्रिय आमदार राजू नवघरे यांचे खंदे समर्थक विनोद अंभोरे यांनी आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० मार्च रोजी जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा पदभार सांभाळताच् बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मागील दोन वर्षापासून रखडलेल्या वेतन नियमित केले.तसेच प्रत्येक रविवार आठवडी बाजाराच्या दिवशी शेतकऱ्यांना खिचडी आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. तसेच २ ऑगस्ट रोजी बाजार समिती कार्यक्षेत्रातील ८३ प्रगतशील शेतकऱ्यांना भव्य कार्यक्रम आयोजित करून आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.या कार्यक्रमात बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना थांबण्याची सोयीसाठी शेतकरी निवासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सभापती विनोद अंभोरे आणि संचालक मंडळाने आमदार राजू नवघरे यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेत आमदार राजू नवघरे यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडे विशेष प्रयत्न करून जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन मंजुर करून घेऊन तब्बल दीड कोटीचा निधी मंजूर करून घेतला.लवकरच जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दीड कोटी रुपये खर्चून संत तुकडोजी महाराज शेतकरी भावनांची सुसज्ज इमारत सर्व सोयी सुविधेसह उपलब्ध होणार आहे.या शेतकरी भावनांचा लाभ जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना होणार आहे.आमदार राजू नवघरे यांनी मागणीची दखल घेत त्वरित शेतकरी भवन व निधी मंजूर करून घेतल्याबद्दल सभापती विनोद अंभोरे,उपसभापती भगवानराव काचगुंडे.आणि सर्व संचालकांनी आमदार राजू नवघरे यांचे आभार मानले.

