google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

मोंढा फिडर ओव्हरलोड होत असल्याने दुसरा नवीन फिडर बसविणार- उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली

वसमत (इसाक पठाण)

वसमत शहरातील मोंढा फिडर ओव्हरलोड होत असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड उकाडाचा त्रास व नेहमी अंधाराचा सामना करावा लागत आहे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी पुढाकार घेतला असून आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या मदतीने या फिडर वरील ओव्हरलोड कमी करण्यासाठी एक नवीन फिडर बसविण्यासाठी कंबर कसली आहे

शहरातील मोंढा फिडर ओव्हरलोड झाल्यामुळे वारंवार ट्रिप होत आहे ट्रिप ची प्रोसेस हे ऑटोमॅटिक असते त्यामुळे एवढे वेळ ट्रीप होत आहे ओव्हरलोड होण्याचा कारण म्हणजे गॅसची कमतरता असल्यामुळे लोकांनी शेगडीकडे धाव घेतली आहे यामुळे विजेचा वापर जास्त होत आहे तसेच सध्या तापमान जास्त वाढत असल्याने कुलर, फँन व ए सी चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे मोंढा फिडरचा ट्रान्सफॉर्मर गरम होत आहे चार कुलर लावून ही त्याचे तापमान सामान्य होत नाही एक ट्रान्सफॉर्मर चा तापमान आणि दुसरा वातावरण चा तापमान वाढल्यामुळे त्या ट्रान्सफॉर्मवरला वारंवार ट्रिपिंग येत आहे व विद्युत पुरवठा खंडित होत आहे.त्यासाठी पर्याय म्हणून मोंढा फिडरचे दोन भाग करण्याकरिता मंजुरी घेण्यात आली आहे रेस्ट हाऊसचे खालचा भाग मोंढा फिडर 2 आणि बहिर्जी कॉलनी जवाहर कॉलनी मोंढा फिडर 1 अशी करण्यात येणार आहे त्या संदर्भात आमदार राजू भैय्या नवघरे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे अशी माहिती उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी दिली.

Share
Back to top button