google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

कंत्राटदारांचे मार्गदर्शक नईम कुरैशी यांची जिल्हा मजुर फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड 🔷🔶🔷🔶🔷🔶 वसमत येथे नईम कुरैशी यांचा भव्य सत्कार ➖➖➖➖➖➖

संपादक -इसाक पठाण

वसमत:-

हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध शासकीय गुत्तेदार मोहम्मद नईम कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या बिनविरोध निवडीचे जिल्हाभर स्वागत केले जात असून वसमत येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

वसमत शहरातील कंत्राटदारांचे मार्गदर्शक एक अनुभवी व्यक्तिमत्व मो.नईम मो.गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज रोजी वसमत येथे आमदार राजुभैया नवघरे पाटील यांचे पिताश्री रमाकांत पाटील नवघरे व भाऊ लक्ष्मीकांतभैया नवघरे पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मोबिनदा , लाला उबारे, अजगर पटेल, राजकुमार ऐंगडे, गौतम वाहूळे,हरून दालवाले , वसंतसेठ चेपुरवार,प्रमोद उबारे , शेख मजहर, मो.वसीम कुरेशी ,वामन हिरवे , एन. आय. पठान , कलीम भाई , जावेद भाई व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संतोष बांगर यांच्याकडून हि सत्कार

हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी वसमत येथील नईम कुरैशी यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे त्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share
Back to top button