google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

बसमत लायन्स क्लब प्लॅटिनम अवाॅर्डने सम्मानित

वसमत. (इसाक पठाण)

वसमत येथील लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांना पुणे येथे पार पडलेल्या बहुप्रांतीय डिस्ट्रिक्ट 32 34 अधिवेशनामध्ये प्लॅटिनम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

जगातली सर्वात मोठी संस्था म्हणून लायन्स इंटरनॅशनल यांचे नाव आहे सदरील संस्थेमध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी 212 देशांचा समावेश आहे अशा संस्थेच्या भारतामध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, कॅन्सर, हंगर अशा विविध माध्यमातून खूप मोठे कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बहुप्रांतीय डिस्ट्रिक्ट 32 34 चे नवे बहुप्रांतीय अधिवेशन विजयोस्तव पुणे येथे दिनांक 16 व 17 मे रोजी पार पडले या अधिवेशनात विदर्भ ,मराठवाडा, खानदेश पुणे कोल्हापूर, सांगली सातारा ,संभाजीनगर, नागपूर, अमरावती ,धुळे ,गोंदिया यामध्ये एकूण 404 क्लब असून 16 हजार 64 सदस्य संख्या कार्यरत आहे. या कार्यक्रमासाठी 6 00 पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विविध अवार्डने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांना व्हिजन या प्रोजेक्ट अंतर्गत प्लॅटिनम अवार्डने सन्मानित करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्टिपल चेअर पर्सन विजय सारडा तर उद्घाटक पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर प्रवीण छाजेड प्रमुख अतिथी म्हणून सीआयडी नरेंद्र भंडारी डिस्ट्रिक्ट 32 34 बी टू च्या डिस्टिक गव्हर्नर रीना छाजेड इंटरनॅशनल डायरेक्टर राजेंद्र मूछल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अश्विन कुमार बजोरिया मल्टिपल सेक्रेटरी गिरीश भाई सिसोदिया मंचावर उपस्थित होते सदरील कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राहुल औसेकर पीडीजी योगेश जयस्वाल सुप्रियाताई कोतवाल अरुण चतुर्वेदी निशिकांत प्रताप ए डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रदीप गर्गे, ट्रेझर डॉक्टर कैलाश मुरारका उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे हे दुसरेच वर्ष असून दुसऱ्याच वर्षात त्यांना मल्टिपल चा प्लॅटिनम अवार्ड मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईड ने मागील वर्षांमध्ये नेत्र तपासणी शिबिर, हंगर, पांघरून वाटप कार्यक्रम, शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार, वृक्ष लागवड, मधुमेह भव्य तपासणी शिबिर, सायकल स्वरांचा सत्कार, नरहर कुरुंदकर यांची एक नाट्य प्रयोग, संगीत मैफिल, आश्रम शाळेतील अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रांगोळी स्पर्धा, दीपावली निमित्त अनाथ आश्रमात फराळाचे वाटप, अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून वसमत शहरात एक नवा पायंडा पडला आहे.

लायन्स क्लब बसमत प्राईस ला या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे लायन्स क्लबचे अध्यक्ष राजू सिद्दिकी, उपाध्यक्ष ऍड अरुण अंबेकर, कल्याण कुरुंदकर, सचिव बाळासाहेब बेले, कोषाध्यक्ष संजीव कुमार बेंडके, सदस्य गौस बाई बागवान, सीए एकनाथ जगताप, राजाराम जगताप, अलोक जाधव, समीर कुरेशी, संदीप चव्हाण सर, प्राध्यापक विक्रम कुंटूरवार, डॉक्टर वैभव पडोळे, डॉक्टर सागर सातपुते, प्रसन्ना देशपांडे, सचिन दगडू, सुहास काकडे, संदीप टाक, माजी अध्यक्ष योगेश चेपूरवार, एडवोकेट प्रदीप देशमुख, वैजनाथ कदम, , आदींची यावेळी अभिनंदन केले आहे.

पुणे येथील अधिवेशनात खामगाव येथील लायन्स नरेश भाई चोपडा, तेजस जी झांबड जालना येथील विजय दाढ, नांदेड येथील गंगा भीषण जी कांकर , मोदीजी, रवी कडगे, डॉक्टर मोहन देशमुख ,डॉक्टर गर्गे , अकोला येथील सुभाषजी चांडक, संभाजीनगर येथील संजय गुप्ता, लातूर येथील पांचाळ आदींची उपस्थिती होती.

Share
Back to top button