वसमत येथे ‘शिवनेरी ॲडव्हान्स स्किन, आयुर्वेदिक अँड डेंटल क्लिनिक’चा भव्य शुभारंभ

- वसमत (इसाक पठाण)
वसमत शहरातील ठक्कर कॉम्प्लेक्स येथे ‘शिवनेरी ॲडव्हान्स स्किन, आयुर्वेदिक अँड डेंटल क्लिनिक’चा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला. वसमत तालुका व शहरातील रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने या क्लिनिकची स्थापना करण्यात आली आहे.
या क्लिनिकचे आयोजन त्वचारोग, केशविकार व आयुर्वेद तज्ञ डॉ. मनिषा साईप्रसाद शिंदे तसेच कॉस्मेटिक डेंटल सर्जन डॉ. साईप्रसाद दिगंबरराव शिंदे यांनी केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक व प्रभावी उपचारपद्धतींचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी नातेवाईक, पत्रकार , शिक्षक, डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत डॉक्टर दांपत्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवनेरी डेंटल क्लिनिक (बँक कॉलनी, वसमत)चे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शिंदे दांपत्यांकडून रुग्णांवर अचूक निदान व परिणामकारक उपचार केले जाणार असून, त्यांच्या या सेवेमुळे रुग्णांच्या दुःखातून मुक्ती मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
