बाभूळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

वसमत (इसाक पठाण)
वसमत तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले
वसमत तालुक्यातील मौजे बाभुळगाव येथे दिनांक 12 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले.यावेळी वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने अध्यक्षस्थानी होते तसेच वसमतचे तहसीलदार विनोद डोणगावकर यांची उपस्थिती होती
या शिबिरात बाभुळगाव मंडळातील जनतेसाठी मंडळ स्तरावर नागरिकांसाठी शिधा पत्रिका वाटप, उत्पन, जातीचे, इ प्रमाणपत्र वितरण, विविध शासकिय योजना बाबत मार्गदर्शन, सं. गा. यो./श्रावण बाळ/ इ. गा. यो पात्र लाभार्थी यांना प्रमाणपत्र वाटप, पुरवठा विभाग विषयक कामकाज, आरोग्य विभाग, कृषी विभाग इत्यादी विविध शासकिय योजनाचा प्रत्यक्ष मंडळ स्तरावर लाभ नागरिकांना देण्यात आला. उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार विनोद डोणगावकर यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकिय योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमस्थळी नायब तहसीलदार हांडे , अनिल पाटील , मंडळ अधिकारी श्रीमती सुप्रिया जिंतुरकर ,ग्राम महसूल अधिकारी गुड्डलवर , पांडे , पाईकराव , सुधीर इंगळे ,श्रीमती पडोले मॅडम, सर्कलवाड , राठोड , कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच व बाभूळगाव मंडळातील ग्रामस्थ,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

