मतदारांच्या मदतीसाठी नगरसेवक आयफान चाऊस मैदानात 🤝🤝🤝🤝🤝🤝 दररोज मदत कक्ष उघडून भरले जात आहे अर्ज

संपादक ::- इसाक पठाण
वसमत:-
प्रभागातील मतदारांचे एस आई आर चे प्रगणक अर्ज भरुन देण्यासाठी प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक आयफान चाऊस मैदानात उतरले असून त्यांनी प्रभागात प्रगणक अर्ज भरणा मदत कक्ष स्थापन केले असून या ठिकाणी मतदारांना दररोज अचूक अर्ज भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
सघा एस आई आर चा दुसरा टप्पा सुरू झाला असून या अंतर्गत प्रगणक अर्ज भरून आनलाईन करण्याची प्रक्रिया बीएलओ मार्फत युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. हे कार्य यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, जिल्हा परिषद विभाग,नगर पालिका, शिक्षण विभाग इत्यादी विभागाचे कर्मचारी अधिकारी प्रयत्नशील आहे.
शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ नियुक्त आहेत एसआईआर अंतर्गतचा पहिला टप्पा बीएलओ मार्फत 2002 च्या यादीतील मतदारांच्या नावाचे आताच्या नावा बरोबर मैपिंग करण्यात आली आहे.या मोहीमेचा दुसरा टप्पा बीएलओ मार्फत प्रगणख अर्ज भरून आनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांना दोन प्रगणक अर्ज देण्यात येत आहे त्यात सधाची अचूक माहिती भरून बीएलओला देणे आवश्यक आहे परंतु बहुतांश अशिक्षित मतदारांना अर्ज कसा अचूक भरावा हे समजत नसल्याने मतदारांची तारांबळ उडत असून मतदार त्रस्त झाले आहेत.अशा अडचणीच्या वेळी प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आयफान चाऊस मैदानात उतरले आहेत.ते मतदाराची जनजागृती करत त्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत विशेष म्हणजे त्यांनी मतदारांच्या सोयीसाठी स्वखर्चाने आपल्या प्रभागात एसआयआर प्रगणक अर्ज (इनोमरेशन अर्ज) भरणा मदत कक्ष स्थापन केले आहे या मार्फत मतदारांना प्रगणक अर्ज अचूक भरून दिले जात आहे . त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते ही कामाला लागले असून दररोज अर्ज भरून दिले जात आहे.
नगरसेवक आयफान चाऊस यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

