ताज्या घडामोडी
भोरीपगाव जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🔴🟠🔴🟠🔴🟠

संपादक -इसाक पठाण
वसमत:-
तालुक्यातील भोरीपगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
शनिवार 15 आगस्ट रोजी भोरीपगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी गणवेशात उपस्थित राहून गावाच्या प्रमुख मार्गावरून प्रभातफेरी काढली.तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच कामाजी पानपट्टे, अनिल आगलावे,माजी चेअरमन मारोती आगलावे, रंगनाथ आगलावे, सखाराम भारती,माजी सरपंच गंगाधर आगलावे,माजी सरपंच डिगांबर भारती,बापूराव आगलावे,कुंडलिक भारती, विठ्ठल आगलावे, मुख्याध्यापक सुभाष खरबळे शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

