आमदार राजू भैय्या नवघरे यांनी डॉ.शेख जफर एकबाल यांचा केला सत्कार

वसमत (इसाक पठाण)
वसमत शहरातील डॉ. शेख जफर इक्बाल अब्दुल कलीम MBBS (BJ Govt. Medical College, पुणे), M.S. (नेत्ररोग) यांनी M.S. (Ophthalmology) ही पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी त्यांचा सत्कार केला
वसमत येथील प्रसिद्ध हार्डवेअर व्यापारी अब्दुल कलीम अब्दुल रशीद यांचे सुपुत्र नेत्ररोग तज्ञ डॉ.शेख जफर एक्बाल अब्दुल कलीम यांनी M.S ( Ophthalmology ) ही पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या निमित्ताने वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी त्यांचा सत्कार केला
या सत्कारात बोलताना आ. नवघरे म्हणाले की डॉ .जफर यांच्या अथक परिश्रमांना, जिद्दीला व चिकाटीला मिळालेले हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे.आपल्या पुढील वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी मनापासून शुभेच्छा.आपण आरोग्य सेवेत उत्तम कार्य करून समाजाचे नाव उज्वल कराल, ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांचे प्रतिनिधी कन्हैया बाहेती, उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली,शेख हारुण दालवाले, रत्नाकर अडसिरे,दिपक हळवे पाटील, शशी कुमार कुल्थे या नगरसेवकास ,मोबीन दा,अमजद खान ऊर्फ नम्मू,एटीएम संघटनेचे अध्यक्ष प्रसिद्ध व्यापारी अब्दुल नईम अब्दुल रशीद, मोहसीन खान,माजीद इनामदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
