उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन एस आय आर विषयी केली जनजागृती..
वसमत
शरीफ आलम
निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी पूर्णनिरीक्षण एस आय आर कार्यक्रमांतर्गत आज मंगळवारी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी विविध भागांमध्ये राजकीय नेते. विधीतज्ञ.तसेच प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देत जनजागृती केली.मतदार यादीचे विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रमास आज दिनांक ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून मतदारचे घरी भेटी देवून गणना प्रपत्र वाटपाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सदरील कामाचे निरीक्षणासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने,मतदार नोंदणी अधिकारी यांनी शहरातील विविध भागामध्ये प्रत्यक्ष जाऊन नगराध्यक्षा सुनीता बाहेती.माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान. माजी नगराध्यक्ष शिवदास बोडेवार. विधतज्ञ एड.सिराज आलम पत्रकार शरीफ आलम.एड फैसल आलम एड.कामरान तसेच शरीरातील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेऊन जनजागृती केली. तसेच एस आय आर बाबत सविस्तर चर्चा केली.तसेच वसमत शहरातील नगरसेवकाना एस आय आर ची माहिती व जनजागृती करण्यासाठी २ जूलै २०२६ रोजी विशेष बैठक घेण्याचे निर्देश विकास माने यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी अशीतोष चिंचाळकर यांना दिले.तसेच आज सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा वसमत चे नूतन तहसीलदार सारंग चव्हाण यांनी कुरुंदा,लोळेश्वर या गांवामध्ये भेट देवून मतदार यादीचे विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगोन पाहणी करुन मार्गदर्शन केले.

