google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत व परिसरात वादळीवाऱ्याने माजविला धुमाकूळ ऊस,केळी भुईसपाट, सोलार पॅनल,झाडे उन्मळून पडली,पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

वसमत (इसाक पठाण)

वसमत शहर व परिसरात विजेच्या कडकडाट पाऊस व वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला असून या वादळात शहरातील टीन शेड,पत्रे उडाली आहे तर भोरीपगांव शिवारातील शेतातील उभी केळी, ऊस भुईसपाट झाले सोलर पॅनल उखडून फेकले गेले या वादळात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी ते करीत आहे

∆चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्याचा धुमाकूळ ∆

शनिवार दिनांक 23 मे रोजी सायंकाळी अचानक आकाशात ढग भरून आले विजेच्या कडकडाटसह हलका पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता वादळी वाऱ्याने धुमाकूळ घालणे सुरू केले शहरातील नांदेड रोड वरील दुकाना समोरील झापडीवजा टीन शेड, छतावरील टीन शेड उडून गेली त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

∆शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान ∆

शहरा पासून जवळ असलेल्या भोरीपगांव शिवारातील अविनाश अरुण पटवे यांच्या शेतातील उभी केळी आडवी होऊन भुईसपाट झाल्याने त्यांचे दहा लाखांचे नुकसान झाले आहे

∆सोलार पॅनलचे प्रचंड नुकसान ∆

कोंडीबा उर्फ बंडू खैरे, राजेंद्र भारती, ज्योती विठ्ठल नरवाडे, अविनाश अरुण पटवे, विलास आगलावे यांच्या शेतातील सोलार पॅनल जमीनीतून उखडून लांब उडून गेले त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतातील व रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली.

@तलाठी व ग्रामसेवक यांची पाहणी @

वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी टाकळगांव सज्जा तलाठी पडोळे मॅडम, ग्रामसेवक आळणे, अर्जून आगलावे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा केला

#नुकसान भरपाईची मागणी #

चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातलाय यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे .

Share
Back to top button