google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशनचा संघ उदगीरला रवाना

वसमत (इसाक पठाण)

राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशन चा संघ उदगीरला रवाना झाला आहे .

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 4 ते 6 जून पर्यंत राज्यस्तरीय टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशन चा संघ उदगीरला रवाना झाला आहे.या संघात आदित्य सोमोसे, मकरंद कुलकर्णी,अनुज काळे, नागेश मुळे, सकलैन रजा,प्रतिक वाटोरे,अय्यान खान,आदर्श राऊत,शेख अफान ,शेख अलतमश आदी खेळाडू सहभागी झाले आहेत .

या निमित्त हिंगोली जिल्हा टेनिस बाल क्रिकेट असोसिएशन चे सचीव तथा वसमत येथील फुलसिंग नाईक शाळेचे अध्यक्ष अमजद खान ऊर्फ नम्मू यांनी व शाळेचे मुख्याध्यापक कैलास राठोड यांनी फुलसिंग नाईक शाळेत खेळाडूचा सत्कार करुन विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कोच शंकर पोघे,फुलसिंग नाईक शाळेचे मुख्याध्यापक कैलास राठोड,शेख साजीद जिलानी पत्रकार इसाक पठाण सर आदी उपस्थित होते.

Share
Back to top button