google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

नांदेडचे प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांना सेवा पुरस्कार 2026 जाहीर

नांदेड:- (इसाक पठाण)

नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा 2026 सेवा पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पोट विकार तज्ञ गॅलेक्सी हॉस्पिटल नांदेडचे डॉ.नितीन जोशी यांना जाहीर झाला असून सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार दिला जाणारा आहे.

महाराष्ट्रात नावाजलेले नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात मागील 10 वर्षांत गॅलक्सी रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन त्यांनी फिरते इंडोस्कोपी सेंटरच्या माध्यमातून गावपोच सेवा देऊन रोगाचे निदान करून कॅन्सरचे ताबडतोब उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यांनी केलेल्या कार्यांची दखल घेत त्यांच्या या योगदानाचा व सत्कर्माचा गौरव करण्यासाठी नांदेड मेडिकल फाउंडेशनने डॉ नितीन जोशी यांना श्रीमती प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार 2026 देण्याचे जाहीर केले आहे.

रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हाटेल चहल पहल जुना कौठा नांदेड येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ पी .डी .जोशी पाटोदेकर राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पदमाकरराव पंडीत यांची उपस्थिती लाभणार आहे.

नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सविता भालेराव, सचीव डॉ.उमेश भालेराव तसेच पुरस्कार समितीचे संयोजक डॉ सुशांत चौधरी यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे.डॉ नितीन जोशी यांना श्रीमती प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share
Back to top button