जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे रविवारी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण..
आ.राजू नवघरे यांची प्रमुख उपस्थिती..
वसमत
शरीफ आलम
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ७९ प्रगतशील शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.रविवारी २ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे राहणार असून यावेळी जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी वसमत विधानसभेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै पासून जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर.महारक्तदान शिबिर.स्वच्छता अभियान. वृक्षारोपण.अभंग वाणी कार्यक्रम.महिला सन्मान कार्यक्रम आदीं विविध सामाजिक उपक्रम राबविले. आमदार राजू नवघरे त्यांचे खंदे समर्थक जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितचे सभापती विनोद अंभोरे यांनी यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जवळबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रगतिशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यासाठी कृषिरत्न पुरस्कार देण्याचे आयोजन केले आहे. २ ऑगस्ट रविवारी ११वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात उपरोक्त कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमात जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील एकूण ७९ प्रगतिशील शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देऊ सम्मानित करण्यात येणार आहे.यावेळी पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांना जवळाबाजार समितीतर्फे बाजार समितीतर्फे एक चार्जिंग स्प्रे पंप सुद्धा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती विनोद अंभोर उपसभापती भगवान काचगुंडे आणि संचालक मंडळाने केले आहे.

