पुरजळ येथील मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात १३० रुग्णांची तपासणी…
४० मोती बिंदू रुग्णांची नांदेड येथे उद्या शस्त्रक्रिया..
- वसमत
शरीफ आलम
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूरजळ सर्कलच्या वतीने आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१जुलै शुक्रवारी बालाजी मंदिर परिसरात भव्य नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण १३० नेत्र रुग्णाची तपासणी करण्यात आली .शुक्रवारी संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन जवळाबाजार कृषी उत्पन्न समितीचे सभापती विनोद अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लक्ष्मीकांत नवघरे.संचालक बाबाराव राखुंडे.माऊली ढोबळे.दिलीप वैद्य.अनिल रुद्रवार.गणेश डुकरे.नारायण चोपडे गणेश हरके आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नांदेड येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी पुरजळ सर्कलातील १३० रुग्णांची नेत्र तपासणी केली. या नेत्र तपासणीत ८० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान करण्यात आले यावेळी ४० रुग्णांना नांदेड येथे आजच शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले शनिवारी त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होणार आहे.उर्वरित चाळीस रुग्णांना सुद्धा एक-दोन दिवसात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे शिबिरचे आयोजक माऊली ढोबळे यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पुरजळ सर्कलातील सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

